लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न ठरले की काय लग्नात कोणते दागिने घ्यायचे? माहित कित्येक दागिन्याचे नाव ही आपल्याला माहित नाही. असेच काही खास महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिने, जे लग्नात वधूला देतील एक क्लासी लुक .

ठुशी. (Thushi)

ठुशी एक अस्सल मराठमोळा दागिना, ठुशी शिवाय मराठी साज शृंगार पूर्ण होऊ शकतच नाही . ठुशी ही प्रामुख्याने कोल्हापूर  येथे तयार होते आणि तेथील ठुशी प्रसिद्ध ही आहे . सोनपरीच्या सर्व ठुशी हा फक्त कोल्हापूर हूनच तयार होऊन येतात .

Thushi

नथ. (Nath)

कोणताही साज शृंगार हा नथ शिवाय पूर्ण होऊच शकत नाही, नथ ह्या अँटिक, राजस्थानी, साऊथ इंडियन, मराठी, पुणेरी, वऱ्हाडी अशा वेगवेगळ्या प्रकारात आहेत . सद्या ऑनलाईन वर दिसणाऱ्या जवळजवळ सर्व म्हणजेच जवळपास १०० पेक्षा जास्त डिझाईन सोनपरी कडे उपलब्ध आहेत .

Nath

तन्मणी. (Tanmani)

हा कारवारी दागिना पुणेरी मोती या प्रकारात मोडतो, पेशवेकालीन दागिना म्हणूनही हा प्रसिद्ध आहे . सोनपरी कडील तन्मणी हें फक्त सेमी कल्चर मोत्यामध्ये पुण्यावरूनच तयार करून येतात . ह्या मध्येही खूप डिझाईन आहेत.

Tanmani

चिंचपेटी.(Chinchpeti)

हा एक अस्सल मराठी दागिना आहे . पेशवेकालीन दागिन्यांमध्ये हिचे महत्व वेगळेच होते . चिंचपेटी मध्ये असलेल्या कस्तूरीवरून तिची किम्मत ठरून असते . ह्या मध्ये भरपूर डिझाईन फक्त सेमी कल्चर मोत्यांमध्ये सोनपरी कडे कायम उपलब्ध असतात .

Chinchpeti

बुगडी.(Bugdi)

आजच्या फॅशनच्या काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवणारा हा एक अस्सल  मराठमोळा दागिना . ह्या मध्ये मोत्याचा, खड्यांचा, पोवळ्यांच्या , सोनेरी, चंद्रकोरीच्या असे अनेक प्रकार सोनपरी कडे नेहमी उपलब्ध असतात .B

Bugdi

कोल्हापूरी साज.(Kolhapuri Saj Neckles)

कोल्हापूरी साज ह्या नावानच  ह्या कोल्हापुरी आणि अस्सल मराठी दागिना असल्याचे अधोरेखिन होते . आजही अघाडीच्या  मराठी तारका त्यांचा साज शृंगार करताना आवर्जून कोल्हापुरी साज घालतात . ह्या मध्येही सोनपरी कडे भरपूर डिझाईन उपलब्ध आहेत .

Kolhapuri Saaj

Leave a Comment

Your email address will not be published.

TOP

X